मराठी टायपिंग कशी करावी ?

मराठी टायपिंग

नमस्कार मित्रांनो, आपल्याला बर्याच ठिकाणी मराठी टायपिंग करावी लागते. तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्या कॉम्प्युटरवर मराठी टायपिंग कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मग सुरु करूयात! 

गुगल इनपुट साधने (Tools) काय आहे ?

Google Input Tools हे गुगल चे फ्री सॉफ्टवेयर आहे.

गुगल इनपुट साधन (Tool) कसे डाऊनलोड करायचे ?

 तुम्ही गुगल चे addon chrome web store वरून डाऊनलोड करू शकता. तुम्ही त्या लिंक वर गेल्यावर Add to chrome आणि नंतर  Add Extension या बटनावर क्लिक करायचे आहे. मग ते extension तुमच्या Chrome Browser ला add होईल.

--------------------------------------------------------------

गूगल मराठी इनपुट टूल वापरण्याच्या 3 सुविधा

खाली आपण कोणत्याही विंडोज, मॅक, क्रोम, अँड्रॉइड किंवा इतर कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवर Google मराठी किबोर्ड वापरू शकता.

1. ऑनलाइन Google इनपुट साधने 

तुम्हांला Google मराठी इनपुट साधन ऑनलाइन वापरायाचे असल्यास तुम्ही खाली दिलेल्या लिंक ला बुकमार्क करणे आवश्यक आहे. तुम्हांला वाटेल तेव्हा तुम्ही ऑनलाइन मराठी टाईप/लिहू शकता.

2. Google इनपुट साधने Chrome extension


क्रोम ब्राउझर ट्रेंडी आहे. वापरकर्ते खालील दुव्यावर दिलेले Google हिंदी कीबोर्ड Chrome extension स्थापित करू शकतात.
Google इनपुट साधने Chrome विस्तार वापरकर्त्यांना “कीबोर्ड शॉर्टकट” सेटिंग पृष्ठाद्वारे पूर्वनिर्धारित कीबोर्ड शॉर्टकट वापरण्याची आणि त्यांचे स्वतःचे शॉर्टकट तयार करण्याची परवानगी देते.

3. अँड्रॉइडसाठी गूगल इंडिक कीबोर्ड

आता तुम्ही मोबाइल वरती पण मराठी टायपिंग सोप्या पद्धतीने करू शकता. Android वापरकर्ते गुगल प्ले स्टोअर वरून गूगल इंडिक कीबोर्ड Install करू शकता. आपण गूगल इंडिक कीबोर्ड च्या सहाय्याने कोणतीही भारतीय भाषा टाइप/लिहू करू शकता. आपल्याला मराठी टायपिंगसाठी मराठी भाषा निवडण्याची आवश्यकता आहे.

आता तुम्ही मराठीमध्ये तुमच्या मित्रांना इमेल करू शकता. मराठी भाषेमध्ये तुम्ही स्वतःचा ब्लॉग पण लिहायला सुरु करू शकता.

जर तुम्ही हा लेख संपूर्ण वाचला असेल तर तुम्ही वरच्या सारखे टायपिंग करू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने