ब्लॉग म्हणजे नक्की काय आहे ?

ब्लॉग म्हणजे नक्की  काय आहे ?| What is Blog in Marathi ?

समजून घ्या अगदी सोप्या भाषेत !

Table of Contents
१.१   प्रस्तावना
१.२  तर ब्लॉग कशाला म्हणतात
१.३  ब्लॉगद्वारे पैसे कसे कमवायचे
१.४  ब्लॉग कसा बनवायचा ?
१.५  ब्लॉगर काय आहे ?
१.६  वेबसाईट आणि ब्लॉग मध्ये काय फरक आहे ?


प्रस्तावना 

   नमस्कार मित्रांनो आज आपण नक्की ब्लॉग म्हणजे काय ते समजून घेऊयात !! .

   २१ व्या शतकात इंटरनेटचा वापर खूप जास्त प्रमाणात वाढला आहे . सरासरी प्रत्येक माणसाकडे  अँड्रॉईड मोबाइल आहे . जो तो बातम्या व माहिती ऑनलाईन शोधतो . जर आपल्याला काही अडचण आली तर आपण इंटरनेट च्या सहाय्याने ती अडचण सोडवू शकतो .

  तुम्ही कधी विचार केला आहे का ?, कि आपण जी माहिती ऑनलाईन वाचतो त्या माहितीला काय म्हणतात व ती कशी तयार होते ? तर ब्लॉगर्स ती माहिती लिहतात आणि पब्लिश करतात .  एखादा ब्लॉगर महत्त्वाची माहिती लिहित असेल व स्वतःचे विचार मांडत असेल त्याला ब्लॉगर असे म्हणतात .   आणि आपण जी माहिती वाचतो त्याला ब्लॉगपोस्ट असे म्हणतात .                                                         

तर ब्लॉग कशाला म्हणतात ? 

ब्लॉग ही एक ऑनलाइन Journal किंवा माहितीची वेबसाइट आहे जिथे सर्वात वरच्या बाजूला नवीनतम पोस्ट प्रथम दिसून येण्यासह उलट कालक्रमानुसार माहिती प्रदर्शित करते. हे एक व्यासपीठ आहे जेथे लेखक किंवा लेखकांचा एक गट स्वतंत्र विषयावर आपली मते सामायिक करतो.

जर तुमच्यामध्ये लेखन कला असेल तर तुम्हीपण तुमचा स्वतःचा ब्लॉग लिहू शकता. तुम्हांला जर दुसर्यांना नवनवीन माहिती देऊ वाटत असेल तर तुम्ही ब्लॉग लिहू शकता . ब्लॉगमध्ये तुम्ही दररोज ब्लॉगपोस्ट लिहू शकता . 

वेबसाईट आणि ब्लॉग मध्ये काय फरक आहे ?

ब्लॉगमध्ये वारंवार Updates ची आवश्यकता असते. यामधील चांगल्या उदाहरणांमध्ये Food Blog येऊ शकतो. त्यामध्ये जेवणाची पाककृती (Recipe) किंवा त्यांच्या उद्योगाच्या बातम्यांबद्दल लिहिणारी कंपनी समाविष्ट होऊ शकते.

वाचकांच्या Engagementला ब्लॉग्ज देखील प्रोत्साहित करतात. वाचकांना टिप्पणी(Comment) देण्यासाठी समुदायापर्यंत पोहचविण्याची संधी आहे. ब्लॉग मालक(Owner) नियमितपणे नवीन ब्लॉग पोस्टसह त्यांची साइट Update करतात.

ब्लॉगद्वारे पैसे कसे कमवायचे ?

जर तुमच्या ब्लॉगवर व्हिजीटर्स जास्त प्रमाणात येत असतील तर तुम्ही तुमच्या ब्लॉग वर ads लाऊन 
पैसे कमाऊ शकता. Adsense तुम्हांला ads लावण्याचे पैसे देते . Adsense काय आहे हे एकदा समजून घ्या . तुम्ही part-time म्हणून ब्लॉगिंग ला घेऊ शकता . 

ब्लॉग कसा बनवायचा ?

तुम्ही स्वतःचा ब्लॉग बनवू शकता अगदी 0 रुपयांत . Googleने  Blogger नावाचे फ्री टूल उपलब्ध करून दिले आहे. ब्लॉगर च्या सहाय्याने तुम्ही वेबसाईट किंवा ब्लॉग अगदी सोप्या स्टेप्स मध्ये बनवू शकता. ब्लॉगर मध्ये ब्लॉग बनवण्यासाठी तुम्हांला तुमचा Email असणे आवश्यक आहे. ब्लॉगर मध्ये ब्लॉग कसा बनवायचा ?

ब्लॉगर काय आहे ?

ब्लॉगर हे एक गुगलचे फ्री सॉफ्टवेअर आहे जे तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्लॉग किंवा वेबसाईट बनवायला मदत करते. सध्याच्या काळात बरेच जण ब्लॉग तयार करण्यासाठी ब्लॉगर चा वापर करतात .

जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता . तसेच या ब्लॉगमध्ये काही बदल आवश्यक असेल तर तुम्ही Contact करू शकता. 

Written and Published by - Sudarshan Dalavi

2 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने