ब्लॉगिंग काय आहे ? What is Blogging ?

What is Blogging - Sudarshan Dalavi

नमस्कार मित्रांनो, Sudarshan Dalavi's Blog मध्ये आपले सहर्ष स्वागत ! आजच्या पोस्ट मध्ये आपण ब्लॉगिंग विषयी सर्व जाणून घेणार आहोत. जर तुम्हांला ब्लॉगिंग, टेक्नॉलॉजी, कोडींग, विषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर आत्ताच या ब्लॉगला सबस्क्राईब करा. म्हणजे आम्ही टाकलेल्या नवनवीन ब्लॉग पोस्ट्सचे नोटीफीकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. चला तर मग सुरु करूयात!

ब्लॉग म्हणजे काय ?

ब्लॉग हा वेबसाइटचा प्रकार आहे जिथे Content उलट कालक्रमानुसार सादर केला जातो (नवीन सामग्री प्रथम दिसते). ब्लॉगचा Content बर्‍याचदा नोंदी किंवा "ब्लॉग पोस्ट" म्हणून उल्लेखित असतो. संभाषणात्मक शैलीत माहिती सादर करण्यासाठी ब्लॉग सामान्यत: एखाद्या व्यक्तीद्वारे किंवा लोकांच्या एका छोट्या गटाद्वारे चालविले जातात. आपल्यालाही जर ब्लॉग सुरु करायचा असेल तर सदर पोस्ट वाचा -:

ब्लॉगिंग म्हणजे काय ? What is Blogging in Marathi ?

ब्लॉगिंग हे ब्लॉगसाठी सामग्री (Content) तयार करणे आणि देखभाल करण्याचे कार्य आहे. ब्लॉग सहसा लिखित शब्दाच्या स्वरूपात असतो.  परंतु त्यात प्रतिमा (Images), व्हिडिओ (Video) किंवा ऑडिओ (Audio) फाईल्स देखील असू शकतात.

सध्याच्या काळात बरेच जण इंटरनेट चा उपयोग माहिती मिळवण्यासाठी करतात. तर काही जण माहिती पुरवण्यासाठी करतात. ते तुम्हाला Webpage च्या माध्यमातून माहिती पुरवतात. ते वेगवेगळ्या Blog Posts टाकतात. 

ब्लॉग कुठे तयार करायचा ? Where to make Blog ?

सध्या ब्लॉग तयार करण्यासाठी बरेच Platforms उपलब्ध आहेत. जसे की, WordPress, Blogger, Medium, Wix, LinkedIn इत्यादी. Blogger वर तुम्ही फ्री मध्ये ब्लॉग तयार करू शकता. Blogger हाताळायला सोपे आहे. जर तुम्ही ब्लॉगिंग मध्ये नवीन असाल तर पहिल्यांदा तुम्ही ब्लॉगर वर ब्लॉग बनवायला पाहिजे. 

ब्लॉगद्वारे पैसे कसे कमवायचे ? How to earn money through blog ?

आपल्या ब्लॉगवर कमाई करण्यासाठी आपण अशा अनेक पद्धती वापरु शकता. आपल्या ब्लॉगिंगच्या पातळीवर आणि ब्लॉगच्या प्रकारानुसार आपण आपल्या शैलीशी जुळणारी पद्धत निवडू शकता. जसे की…

  1. ब्लॉगवर जाहिराती दाखविणे (ऐडसेन्स, मिडिया.नेट)
  2. Amazon Affiliates 
  3. कोर्सेस विकणे 
  4. एफिलीएट मार्केटिंग ( Affiliate marketing )
  5. प्रायोजित पोस्ट (Sponsored posts )

डोमेन नेम आणि होस्टिंग काय आहे ? What is Domain and Hosting ?

डोमेन नेम म्हणजे तुमच्या ब्लॉग/वेबसाईट ची ओळख असते. म्हणजेच ब्लॉग/वेबसाईट जर तुमचे घर असेल तर डोमेन नेम तुमचा पत्ता असेल. डोमेन नेम ची उदाहरणे- www.google.com , www.youtube.com . youtube.com टाईप केल्यावर आपण युटयूबवर जातो. 

सदर पोस्ट संपूर्ण वाचा जेणेकरून तुम्हांला वेब होस्टिंग म्हणजे काय ? विषयी सविस्तर माहिती मिळेल.

ब्लॉगिंग म्हणजे काय ? Sudarshan Dalavi

ब्लॉगमधून आपण किती पैसे कमावू शकता?

तुमच्या ब्लॉगवर जेवढे व्हिजीटर्स येतात त्यावर तुमची कमाई अवलंबून असते. जर प्रतिमहिना तुमच्या ब्लॉगवर 1000 views येत असतील तर तुम्ही साधारणतः

आपण किती पैसे कमवू शकता हे काही घटकांवर अवलंबून आहे जसे:

  • आपण कोणता Niche निवडत आहात?
  • आपण शिकण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी किती वेळ समर्पित करता ?
  • आपण आपल्या ब्लॉगवर किती Traffic आणता ?
  • आपण कोणती Digital Marketing तंत्रे अंमलात आणता?


2 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने